समाजवादी पक्षाचे नेते पीडित कुटुंबाच्या भेटीला, पोलिसांचा लाठीमार

आरएलडी पक्षाचे कार्यकर्ते आणि सपा कार्यकर्त्यांनी गावात घातला गोंधळ

0

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी वेगवेगळे राजकीय पक्ष घटनास्थळी पोहोचले. आज सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या सूचनेवरून समाजवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने पीडित कुटुंबाची भेट घेतली. यासह आरएलडी पक्षाचे कार्यकर्ते आणि सपा कार्यकर्त्यांनी गावात गोंधळ घातला.

हाथरसमधील पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी आरएलडी आणि सपाचे कार्यकर्ते आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी दगडफेक करून पोलिसांचा सुरक्षा कडे तोडले. यानंतर पोलिसांना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करावा लागला. यावेळी आरएलडी कार्यकर्ते ग्रामस्थांशी भिडले. ज्यामुळे ग्रामस्थ व कार्यकर्ते यांच्यात जोरदार दगडफेक सुरू झाली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी समाजवादी पक्षातील केवळ 5 लोकांना भेटण्याची परवानगी दिली होती. त्याचबरोबर जमावबंदी नुसार जमावासह आलेल्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांना रोखण्यात आले.  परिस्थिती बिघडण्यापूर्वी राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी  म्हणाले की, त्यांचे कार्यकर्ते केवळ पीडित कुटुंबाचे दुःख जाणण्यासाठी आले आहेत. त्यांनी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नाही. ते मर्यादित कार्यकर्त्यांसोबत आले आहेत. राज्यात अशी घटना घडल्यानंतर पीडितांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाठीचार्ज आणि दगडफेकीनंतर सांगितले की, ते देश  आणि लोकशाही वाचविण्यासाठी आले आहेत. आमच्या बहिणी आणि मुलींवर अन्याय होत असेल तर त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करण्यात काय चूक आहे. परंतु, पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला. पोलिसांनी महिलांनाही सोडले नाही. त्यांच्यावरही लाठ्या चालवल्या.  या प्रकरणात, पीडितेच्या वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी केली, जी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. योगी आदित्यनाथ सरकारने हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली आहे. तत्पूर्वी, यूपीचे डीजीपी आणि गृहसचिव अवनीश अवस्थी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. पीडित कुटुंबाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर ठेवल्या, त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा सीबीआय चौकशीचे आदेश दिले.

 

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.