सलमानच्या जामीन अर्जावर दुपारनंतर निर्णय

0

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर तुरुंगात दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानच्या जामीनावर आज दुपारपर्यंत निर्णय येण्याची शक्यता आहे. सलमानच्या जामीनासाठी अनेक अडचणी येत आहेत. कारण त्याच्या जामीनावर सुनावणी करणारे न्यायाधीश आर के जोशी यांची बदली झाली आहे. मात्र सत्र न्यायालयात जोशी यांच्याच समोर सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर दुपारी 2 नंतर निर्णय दिला जाणार आहे.

जोधपूर न्यायालयात सलमानच्या बहिणी अलविरा आणि अर्पिता आणि बॉडिगार्ड शेरासुद्धा उपस्थित आहेत. जोधपूर न्यायालयाचे वकील रविंद्र जोशी यांची बदली झाल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. मात्र त्यांना बदलीची ऑर्डर अजून मिळाली नसल्याने न्यायाधीश जोशीच सलमानच्या जामीनावर सुनावणी करणार आहेत. राजस्थानमधील 87 न्यायाधीशांची शुक्रवारी रात्र बदली झाली आहे. त्यामुळे सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार की नाही, याबाबत तर्कवितर्क सुरु होते.

गुरुवारी सलमान 20 वर्षे जून्या काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरला होता. त्याला 5 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सध्या तो जयपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.