शिर्डीतील साईमंदिर भाविकांसाठी खुले; मात्र दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग

शिर्डीत ग्रामस्थ आणि भाविकांनी एकमेकांना पेढे वाटून जल्लोष साजरा

0

शिर्डी : राज्यातील मंदिरे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं आहे. कोरोनाच्या‌ संकटामुळे 17 मार्चपासून साई मंदिर बंद असल्याने शिर्डीचं सर्व अर्थकारण ठप्प झाले होत. या अर्थकारणालाही आता चालना मिळणार आहे. मंदिर दर्शनासाठी खुले होणार असल्याने शिर्डीत ग्रामस्थ आणि भाविकांनी एकमेकांना पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

शिर्डीचे साईमंदिर भाविकांसाठी खुले झाले असले तरीही दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. शिर्डीत दररोज सहा हजार भाविकांना दर्शन दिले जाईल. त्यामुळे ऑनलाईन दर्शन बुकींग असणाऱ्यांनीच शिर्डीत यावे, असे आवाहन साईबाब संस्थानकडून करण्यात आले आहे. भाविकांना सुलभ दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. सोमवारपासून दर्शनासाठी परवानगी देण्यात येणार असल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नियमांचे पालन करत भाविकांसाठी हे मंदिर खुले करण्यात येत आहे. आपली गैरसोय होणार नाही, याची भाविकांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणाले की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.