परळीत ‘साई कुलर उद्योग’ आगीत भस्म्सात, जीवितहानी टळली, आर्थिक नुकसान

आगीत सुमारे 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

0

परळी : शहराच्या मध्यवस्तीतील वैद्यनाथ सहकारी औद्योगिक वसाहतमधील साई कुलर्सला  आग लागली. या आगीत पूर्ण उद्योग जळून भस्मसात झाला असून या आगीत सुमारे 40 लाख रुपयांचे नुकसान  झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तासभर ही आग अक्षरशः धुमसत होती. आकाशात आगीच्या धुरामुळे काळोख निर्माण झाला होता. त्यातच परळी नगर परिषद, परळी औष्णीक विद्युत केंद्र आदींसह पाच पेक्षा अधिक अग्निशामक दलाने आग विझविण्याचे काम केले आहे. दरम्यान, आग लागल्याचे वृत्त समजताच लोकप्रतिनिधींसह नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली.
शहरातील वैद्यनाथ सहकारी औद्योगीक वसाहतीत असलेल्या सुनील सोळंके यांच्या साई कुलर या व्यवसायाला आज आग लागली.  उद्योगातील कर्मचारी काम करीत असतांना त्यांना आग लागल्याचे लक्षात येताच, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु पाठोपाठ आग मात्र वाढतच  होती. पाहता-पाहता आगीने रौद्र रुप धारण केल्याने आगीचे आणि धुराचे लोट आकाशाच्या दिशेने धाऊ लागले होते. एकामागून एक अग्निशमन दल आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रात्री 9 च्या दरम्यान ही आग आटोक्यात आली. सुनील सोळंके यांचा साई कुलर हा कारखाना येथे असून या आगीत कुलर तयार करण्याच्या लहान-मोठ्या सर्व साहित्यांची अक्षरशः राखरांगोळी झाली होती.

आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा
औद्योगिक वसाहतीतील साई कुलरला लागलेली आग आटोक्यात आणण्याचे अग्निशामक विभागासाठी मोठे आव्हान होते. वसाहतमधील मध्यभागी हा उद्योग असून आग मोठी असल्याने कुठून सुरुवात करावी, असा प्रश्न अग्नीशामक विभागाला पडला होता. न.प.च्या कर्मचार्‍यांनी अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्टा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले. शिडी लावून शेजारच्या उद्योगाच्या शेडवर चढून तर कधी दुसर्‍याच उद्योगातून पाईप टाकत आगीवर त्यांनी नियंत्रण मिळविले आहे. न.प.च्या अग्नीशामक विभागाला परळी औष्णीक विद्युत केंद्र, अंबाजोगाई, सोनपेठ व गंगाखेड येथील न.प.च्या अग्नीशामकविभागाने मोठी साथ दिली. चांगल्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले . परंतु नुकसान मात्र दुर्दैवाने टाळता आले नाही.
औद्योगिक वसाहतमधील साई कुलरला आग लागल्याचे वृत्त समजताच परळी न.प.गटनेते वाल्मीक कराड, वसाहतीचे चेअरमन प्रकाश सामत, न.प.सदस्य चंदुलाल बियाणी, भाजप शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, मुख्याधिकारी अरविंद मुंडे,नगरसेवक दीपक देशमुख, न.प.सदस्य प्रा.पवन मुंडे, जयपाल लाहोटी, नरसिंग सिरसाठ, शहर ठाण्याचे पो.नि. हेमंत कदम, संतोष रोडे, न.प.सदस्य राजाखान पठाण, उद्योजक रतन कोठारी, जगदीश मंत्री, अमोल दुबे, प्रणव परळीकर आदींनी अक्षरशः घटनास्थळी तळ ठोकत आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.