‘सेफ एक्स्प्रेस’ कंपनीच्या औरंगाबादेत ‘अल्ट्रा मॉडर्न लॉजिस्टिक पार्क’चे उद्घाटन

जागतिक दर्जाच्या मालवाहतूकीच्या सुविधा; सुरक्षित आणि वेगवान वाहतूक

0

औरंगाबाद : भारतातील सर्वात मोठी पुरवठा साखळी असलेल्या सेफ एक्सप्रेस कंपनीने औरंगाबादेत पाऊल टाकले असून आपल्या ५३ व्या ‘अल्ट्रा मॉडर्न लॉजिस्टीक पार्कचे ८ ऑगस्ट रोजी उद्घाटन झाले. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्र्वभूमीवर शहराच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ही घटना महत्वाची ठरणार आहे.
औरंगाबाद शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर औरंगाबाद पुणे आणि सोलापूर धुळे महामार्गापासून अवघ्या काही किलोमिटर अंतरावर लिंबेजळगाव शिवारात उभारण्यात आलेल्या लॉजिस्टिक पार्कचे उद्घाटन कंपनीचे उपाध्यक्ष एस.के. जैन, क्षेत्रीय व्यवस्थापक अजय खन्ना , क्षेत्र व्यवस्थापक अनुप ब्राह्मणकर यांच्या उपस्थितीत झाले.१.५० लाख चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेल्या लॉजिस्टीक पार्कमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. बारा महिने चोविस तास येथून देशाच्या कानाकोपऱ्यात मालाची ने-आण वेगवानरितीने करता येणार आहे. एकाच वेळी वेगवेगळया प्रकाराच्या सत्तावीस वाहनांमधून मालाची चढ-उतार प्रशिक्षीत कामगारांच्या माध्यमातून येथे होऊ शकते. राज्याच्या सुवर्ण त्रिकोनातील सर्वात महत्वाचे शहर म्हणून औरंगाबाद वेगाने विकसित होत आहे. त्यासाठी येथे वेगवान सुविधांची गरज असून सेफ एक्स्प्रेस कंपनीचा अल्ट्रा मॉडर्न लॉजिस्टीक पार्क महत्वाची भूमिका बजावणार आहे. मागील वर्षी सेफ एक्स्प्रेसने भारताच्या विविध भागांत १४ अल्ट्रा-मॉडर्न लॉजिस्टिक पार्क सुरू केले आहेत. अगदी वीस किलोपासून ते शेकडो टनापर्यंतची वाहतूक सेफ एक्स्प्रेसमार्फत करण्यात येणार असल्याने लहान व्यावसायिकांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांसाठी सेफ एक्स्प्रेसची सेवा महत्वाची ठरणार आहे. पुरवठा साखळी आणि व्यवस्थापनामध्ये हा लॉजिस्टीक पार्क मध्यवर्ती भूमिका बजावेल, असा विश्वास उद्घाटनाच्या प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केल.
सेफ एक्स्प्रेसने १९९७ मध्ये  ग्राहकांना वेगवान आणि सुरक्षित वाहतूक बरोबरच माल व्यवस्थापनातील सेवा देण्यासाठी आपला प्रवास सुरू केला. आज ही वंâपनी भारतातील पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्स उद्योगातील ‘नॉलेज लीडर’ आणि ‘मार्केट लीडर’ म्हणून ओळखली जाते. एका वर्षामध्ये १०० दशलक्षाहून अधिक पॅकेजेस वितरणाची क्षमता, दिवसाला १०,००,००० कि.मी.पेक्षा जास्त अंतर कापनारी जीपीएसने सुरसज्जीज ७००० वाहने आणि ३०३३८ पिन कोडचे सर्वात मोठे नेटवर्क कंपनीकडे आहे. १६ दशलक्ष चौरस फूटपेक्षा जास्त वेअर हाउसिंगच्या माध्यमातून दिवसाचे २४ तास, वर्षातून ३६५ दिवस ही कंपनी कार्यरत असते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.