सदाभाऊ भाजपला : ‘का रे दुरावा’, मोठ्या निर्णयाच्या तयारीत

सदाभाऊ खोत यांना'गरज सरो अन् वैद्य मरो' या उक्तीचा अनुभव

0

सांगली : भाजपप्रणीत आघाडीशी काडीमोड घेऊन पश्चिम महाराष्ट्रात स्वतंत्र राजकीय चूल उभारण्याची तयारी माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ या उक्तीचा अनुभव सदाभाऊ खोत यांना आला आहे. त्यामुळे ते वेगळी चूल मांडण्याच्या तयारी आहेत.

सदाभाऊ खोत यांची राजकीय उपयुक्तता संपुष्टात आल्याने भाजपने त्यांना जिल्ह्याच्याही राजकारणातून डावलण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप खोत यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्याचीच दखल घेतच सदाभाऊ खोत बंडाचे निशाण फडकावण्याच्या प्रयत्नात असल्याचे राजकीय निरीक्षकांकडून सांगितले जात आहे. भाजपसाठी सदाभाऊ खोत यांनी ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेला रामराम ठोकला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळात स्थान दिले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाची युती तोडली होती. त्यानंतर मात्र, राजू शेट्टींचे राजकारण कमकुवत करण्यासाठी त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांच्याशी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळीक साधली. एवढेच नाही तर त्यांचा पाठिंबा घेतला होता. नंतर सदाभाऊ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिले होते. परंतु आता आता भाजपकडून त्यांना डावलले जात आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात सदाभाऊ खोतांनी जहरी टीका केली होती. त्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींचे खोत यांच्यावरील प्रेम कमी झाल्याचे दिसत आहे. इस्लापूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूर जुळल्यानंतर खोत यांच्याकडे राजकीयदृष्ट्या कानाडोळा करण्याचा पवित्रा भाजपने घेतला. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना आपली राजकीय प्रतिष्ठा गमावल्याचे जाणवू लागल्यानंतर त्यांनी भाजपपासून दूर होण्याचे राजकीय संकेत दिले आहेत. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात भाजपची आजीव सभासद नोंदणी करण्यात येत होती. सदाभाऊ खोत यांनी सांगली, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्ह्यांतून आपल्या शेकडो कार्यकर्त्यांचे सभासद नोंदणीचे अर्ज आणि पैसे जमवले. पक्षाने दिलेल्या वेळेतच हे सर्व अर्ज पक्षाकडे सुपूर्द केले. परंतु काही दिवसांपूर्वीच पक्षश्रेष्ठींनी सदाभाऊ यांच्या गटांचे सर्व अर्ज फेटाळत त्यांनी गोळा केलेला निधीही त्यांना परत करण्यात आला. सदाभाऊंनी पक्षसंघटनेत आता आपल्याला स्थान नाही हे जाणून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यावेळी अनेकांनी भाजपला सोडून वेगळा पर्याय निवडावा, अशी विनंती सदाभाऊ खोत यांच्याकडे केली आहे. आता सदाभाऊ खोत याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.