राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची अफवा…

भाजपमध्ये गेलेलेच आमदार स्वगृही परतण्यास उत्सुक - नवाब मलिक

0

मुंबई : राजस्थानमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आता महाराष्ट्रातही राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र हे वृत्त केवळ अफवा असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. हे वृत्त निराधार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आता महाराष्ट्रातही राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र हे वृत्त केवळ अफवा असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. हे वृत्त निराधार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी ट्विट केले की, ‘काही जण राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या अफवा पसरवत आहेत. हे वृत्त निराधार आणि कपोलकल्पित आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याविषयी लवकरच निर्णय घेऊन अधिकृत घोषणा करण्यात येईल.’

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.