सत्ताधारी शिवसेनेची राज्यभरात विजयी घोडदौड

हातकणंगले मतदारसंघातील मिणचे ग्रामपंचायतीवर फडकला शिवसेनेचा पहिला भगवा

0

मुंबई : राज्यातील 12 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचा निकाल हाती येत आहे. त्यात सत्ताधारी शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यापाठोपाठ विरोधी पक्ष असलेला भाजपलाही अनेक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आज जसेजसे निकाल हाती येत आहेत, तसं शिवसेनेच्या वर्चस्वाखालील ग्रामपंचायतींची संख्या वाढताना पाहायला मिळते आहे. आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर हातकणंगले मतदारसंघातील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा पहिला भगवा फडकल्याचे दिसले. हातकणंगले मतदारसंघातील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेना प्रणीत प्रवीण यादव युवा शक्ती आघाडीचे 13 पैकी 10 उमेदवार विजयी झाले आहेत. निकाल जाहीर होताच, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. तिकडे राधानगरी मतदारसंघातील बारवे गावात शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाची सत्ता आली आहे. बारवे गावात आबिटकर गटाने 9 पैकी 6 जागा जिंकत विजय मिळवला आहे.

हातकणंगले तालुक्यातील बिरदेववाडीत भाजपला जोरदार धक्का देत शिवसेनेनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय. बिरदेववाडी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने 7 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. हा विजय मिळवून शिवसेनेने भाजपची 40 वर्षांची परंपरा खंडित केली. तिकडे सोलापूरमधील नांदणी ग्रामपंचायतीवरही शिवसेनेचा विजय झाला आहे. एकूण 9 जागांपैकी 6 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने सत्ता मिळवली. तर काँग्रेसला 3 जागा मिळवण्यात यश आले.

कोरेगाव तालुक्यात शशिकांत शिंदेंना धक्का
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात महाविकास आघाडीतील सहकारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे. कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या 5 ग्रामपंचायती शिवसेने खेचून आणल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. मंगळापूर, किन्हई पेठ, कटापूर, ल्हासुर्णे आणि देऊर या राष्ट्रवादीच्या ताब्यातील ग्रामपंचायती शिवसेनेने खेचून आणल्या आहेत.

पाटण तालुक्यात शिवसेनेचा सर्वात मोठा विजय 

शिवसेनेला सर्वात मोठा विजय सातारा जिल्ह्यात मिळताना पाहायला मिळत आहे. कारण सातऱ्यातील पाटण तालुक्यात आतापर्यंत 18 ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. त्यापैकी 13 ग्रामपंचायतींवर शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर 8 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यामुळे पाटण तालुक्यात शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बाजी मारल्याची पाहायला मिळत आहे. हा विजय म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरील नागरिकांचा विश्वास असल्याची प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचा झटका
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर यामूळे गावात शिवसेनेने पाटलांना मोठा झटका दिला आहे. खानापूर गावातील 6 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाचा येथे विजय झाला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.