रासपचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष विनायक भिसे यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीचे औचित्य

0

हिंगोली  : रासपचे युवक आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा मराठा शिवसैनिक सेना या संघटनेचे संस्थापक तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा प्रदेश कार्याध्यक्ष विनायक भिसे व मराठा शिवसैनिक सेनेचे पप्पू चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजप नेत्या जिंतूरच्या आमदार मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते विनायक भिसे व पप्पू चव्हाण यांचा प्रवेश झाला आहे. रासपचे युवक आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा मराठा शिवसैनिक सेना या संघटनेचे संस्थापक तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा प्रदेश कार्याध्यक्ष विनायक भिसे व मराठा शिवसैनिक सेनेचे पप्पू चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे, माजी आ. गजानन घुगे, माजी आ. रामराव वडकूते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.