आज रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित ‘मीटिओर 350’ ही बाईक लाँच

रॉयल एनफिल्डची शानदार मीटिओर 350 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

0

मुंबई : रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित मीटिओर 350  ही बाईक आज लाँच करण्यात आली आहे. 650 ट्विन्सच्या लाँचिंगनंतर रॉयल एनफिल्डसाठी ही महत्त्वाची बाईक आहे. मीटिओर रेंज ही नव्या इंजिनासह विकसित करण्यात आली आहे. नवीन मीटिओर 350 एका ग्लोबल प्रॉडक्टच्या रुपात सादर केली आहे. ही शानदार बाईक तीन व्हेरिएंट्ससह (फायरबॉल, स्टॅलर आणि सुपरनोव्हा) लाँच करण्यात आली आहे. रॉयल एनफिल्ड मीटिओर 350, थंडरबर्ड 350 एक्स ला रिप्लेस करणार आहे.

रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित मीटिओर 350  ही बाईक आज लाँच करण्यात आली आहे. 650 ट्विन्सच्या लाँचिंगनंतर रॉयल एनफिल्डसाठी ही महत्त्वाची बाईक आहे. मीटिओर रेंज ही नव्या इंजिनासह विकसित करण्यात आली आहे. नवीन मीटिओर 350 एका ग्लोबल प्रॉडक्टच्या रुपात सादर केली आहे. या बाईकमध्ये नवीन डिव्हाइस कन्सोल सेट-अप आणि स्प्लिट सीट डिजाइन देण्यात आली आहे. हेडलाईट आणि टेललाईटमध्येही बदल करण्यात आले आहेत. डिझाईनच्या बाबतीत या बाईकमध्ये टियर-ड्रॉप शेप्ड इंधन टॅन्क, ब्राईट कलर ऑप्शन, एलईडी लाईट आणि एका स्प्लिट-सीटचा समावेश करण्यात आला आहे. नव्या मीटिओर 350 मध्ये एक नवीन फ्रेम आणि नवीन इंजिन देण्यात आलं आहे. मीटिओर 350 मध्ये डबल-क्रॅडल चेसिसचा वापर करण्यात आला आहे. असं सांगितलं जातंय की, नवीन 350 सीसी इंजिन पूर्वीपेक्षा जास्त पॉवर आणि टॉर्क निर्माण करेल. या बाईकचं इंजिन 20.2 बीएचपी आणि 27 एनएम पीक टॉर्क निर्माण करु शकतं. मीटिओरला एक मीडियम टीएफटी कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत मेन यूनिट जे ट्रिप मीटर आणि इतर डिटेल्ससाठी अॅनालॉग स्पीडोमीटर एलईडी पॅनलसह आहे. Meteor 350 मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डिजिटल अॅनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि नवीन टीएफटी डिस्प्लेमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सुविधा आहे. आरई मीटिओर r 350 ची किंमत 1.5 लाख ते 2 लाख रुपये इतकी आहे. बेनेल्ली इम्पेरियाल 400, जावा 300आणि नुकतीच लाँच झालेल्याहोंडा H’Ness CB350 या गाड्यांना आरई मीटिओरr 350 टक्कर देईल. गेल्या आठवड्यात कंपनीने या शानदार बाईकचा टीझर लाँच केला होता. हा टीझर पाहिल्यापासून अनेक तरुण या बाईकच्या लाँचिंगची वाट पाहात होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.