रोहित पवारांची चिंता धनंजय मुंडे यांनी केली दूर; दिले ‘हे’ आश्वासन

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल चिंता व्यक्त करणारे ट्वीट

0

अहमदनगर : ऊसतोड कामगारांची मुलं फडात नाही तर लवकरच चांगल्या शाळेत दिसतील,’ असे आश्वासन मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना दिले आहे. ‘आपण ऊसतोड कामगारांच्या लेकरांची परवड व शैक्षणिक नुकसान कायमचे थांबावे व त्यांचे भविष्य उज्वल व्हावे या दृष्टीने स्व.गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजना करत आहोत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघातील ऊसतोड कामगारांना कुटुंबीयांची भेट घेतली. याबाबतची माहिती देताना पवार यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांची होत असलेली परवड मांडली होती. तसे ट्विट त्यांनी केले आहे. ‘माझ्या मतदारसंघातील काही ऊसतोड कामगार कुटुंबांची भेट झाली असता त्यांच्या लहान मुलांना शाळेऐवजी ऊसाच्या फडात पाहून वाईट वाटले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेजी या मुलांच्या हाती कोयत्याऐवजी लेखणी देण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागणार आहे, आणि आपण ते द्याल, असा विश्वास आहे,’ असे ट्विट पवार यांनी केले. या ट्विटला मुंडे यांनी तातडीने कमेंटसह रिट्विट केले असून ऊसतोड कामगारांची मुली लवकरच फडाऐवजी चांगल्या शाळेत दिसतील, असे स्पष्ट केले. ‘रोहित पवारजी, आपण ऊसतोड कामगारांच्या लेकरांची परवड व शैक्षणिक नुकसान कायमचे थांबावे व त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, या दृष्टीने स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजना करत आहोत. ही मुले फडात नाही तर लवकरच चांगल्या शाळेत दिसतील!’ असे मुंडे यांनी म्हंटले आहे. त्यावर पवार यांनी मुंडे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.