‘पार्थ पवार प्रकरणात रोहित पवारांची प्रतिक्रिया

पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाची सीबीआयकडून चौकशीची मागणी

0

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पार्थ पवार यांना फटकारल्याचा मुद्दा सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी फार काही बोलण्यास नकार दिला. त्यांनी इतकेच म्हटले की, पवार साहेब पार्थला जे बोलले, तो कौटुंबिक विषय आहे, राजकीय नाही.

‘पद्म पुरस्कार’ समितीवर नियुक्ती झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यावर होणाऱ्या टीकेलाही रोहित पवार यांनी  प्रत्युत्तर दिले. त्यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली. आदित्य ठाकरे यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड होणे, ही चांगली बाब असल्याचे रोहित पवार  म्हणाले. पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाची सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे राज्य सरकारची चांगलीच गोची झाली होती. यानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पार्थ पवार यांना जाहीरपणे फटकारले होते. पार्थ पवार अपरिपक्व आहेत. त्यांच्या मताला मी काडीचीही किंमत देत नाही, असे पवार यांनी म्हटले होते. या वक्तव्याने अजित पवार आणि पार्थ पवार प्रचंड दुखावल्याचे समजते. त्यामुळे पवार कुटुंबात अंतर्गत कलह निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सर्वकाही आलबेल असे  सांगत असले तरी अजित पवार आणि पार्थ पवार यांनी अद्याप जाहीरपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष पार्थ पवार यांच्या भूमिकेकडे लागले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.