रोहित पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीस; ‘ओमनी’ला धक्का मारून खड्ड्यातून बाहेर

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्तांना मिळाले तात्काळ उपचार

0

सांगली : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्त काही नागरिकांना तात्काळ उपचार मिळाले. अपघात झाल्यामुळे रस्त्याच्याकडेला खड्ड्यात गेलेली ओमनी कार रोहित पवार यांच्या नजरेस पडली. त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडी थांबवून खड्ड्यात गेलेल्या या ओमनी कारला धक्का मारत बाहेर काढण्यास मदत केली आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. त्यामुळे या अपघातातील जखमींना वेळेत उपचार मिळाले. 

रोहित पवार हे माण तालुक्यातील मांडवे-पिंगळी येथेून जात होते. यावेळी त्यांना रस्त्याच्याकडेला एका शेतकऱ्याच्या ओमनी कारला अपघात झाल्याचं दिसलं. त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडी थांबवून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही ओमनी कार खड्ड्यातून बाहेर काढण्यास मदत केली. ओमनी कार बाहेर काढल्यानंतर त्यांनी तात्काळ अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आणि डॉक्टरांशी बोलून त्यांच्यावर उपचार करण्यास सांगितले. त्यामुळे या अपघातातील जखमींना वेळीच उपचार मिळू शकले. रोहित पवार यांनी त्यानंतर ट्विट करून या अपघाताची माहिती देतानाच अशा अपघाताच्या प्रसंगी मदत करण्यासाठी नागरिकांना पुढे येण्याचं आवाहनही केले आहे. पोलिस चौकशीला घाबरून अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळे वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचेाप्राण जाऊ शकतो. त्यामुळे माझे आवाहन आहे, कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा आणि पोलिसांनाही विनंती आहे, अशा नाागरिकांना चौकशीसाठी त्रास देऊ नये, असे ट्विट पवार यांनी केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.