ज्याेतीनगरजवळ विवेकानंद चाैकात मद्यधुंद कारचालकाने रिक्षाचालक, दुचाकीस्वाराला उडवले

दुचाकीस्वार गंभीर तर रिक्षाचालक किरकाेळ जखमी, या अपघातामुळे कारसह दुचाकी व रिक्षाचे नुकसान

0

औरंगाबाद : मद्यधुंद अवस्थेत, सुसाट जात असलेल्या कारचालकाने रिक्षासह दुचाकीस्वाराला उडवले. मंगळवारी रात्री ११ वाजता ज्याेतीनगरजवळील विवेकानंद चाैकात माजी आमदार श्रीकांत जोशी यांच्या घरासमोर हा अपघात झाला. यात दुचाकीस्वार गंभीर तर रिक्षाचालक किरकाेळ जखमी झाला. या अपघातामुळे कारसह दुचाकी व रिक्षाचे नुकसान झाले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, न्यू एसबीएच काॅलनीतील जुन्या राकाज क्लबकडून आतील रस्त्याने एक कार (एमएच२०/ ईवाय २६७७) सुसाट वेगात येत हाेती. ज्योतीनगर चौकाकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला (एमएच २०/ ईएच ३८४१) कारने आधी जोरात उडवले. त्यानंतर कारने दर्गा चाैकाकडून राेपळेकर रुग्णालयाकडे जाणाऱ्या दुचाकीला व अन्य एका रिक्षाला जाऊन धडकली. दुचाकीस्वार दोन्ही वाहनांना धडकून गंभीर जखमी झाला. रिक्षाचालक सतीश गंगावणे हेदेखील गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती कळताच पोलिसांनीदेखील धाव घेतली. तोपर्यंत कारचालक मद्यधुंद अवस्थेत गाडीतच पडून होता. काही वेळाने त्याला बाहेर काढले, तेव्हा त्याने जमिनीवर अंग टाकून दिले. जखमी वाहनचालकासह कारचालकालाही पाेलिसांनी रुग्णालयात दाखल केले.

‘महाराष्ट्र शासन’चा बाेर्ड लावलेली कार भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्याची
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार प्रशांत दाभाडे या व्यक्तीच्या नावावर आहे. दाभाडे उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालयात कामाला असल्याचे कारमधील कागदपत्रांवरून समोर आले. कार स्वतः दाभाडे चालवत होते की आणखी कुणी चालवत होते, हे मात्र रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही. अपघातग्रस्त कारवर ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहिलेली पाटीदेखील लावली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.