मराठा तरुणाच्या ‘सुसाईड नोट’वर हस्ताक्षर तज्ञांकडून खुलासा

सुसाइड नोट बनावट असल्याचे स्पष्ट

0

बीड :  मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च  न्यायालयाने  स्थगिती दिल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे विवेक रहाडे याने आपल्या सुसाईट नोटमध्ये लिहिल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी ही सुसाईड नोट हस्ताक्षरतज्ञांकडे पाठवली होती. हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल आता आला असून ही नोट बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले. बीड पोलिस अधीक्षक रामा राजा स्वामी यांनी प्रसार माध्यमाना यासंदर्भात माहिती दिली.

विवेक रहाडे याने आपल्या सुसाईट नोटमध्ये लिहिल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी ही सुसाईड नोट हस्ताक्षरतज्ञांकडे पाठवली होती. हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल आता आला असून ही नोट बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले. बीड पोलिस अधीक्षक रामा राजा स्वामी यांनी प्रसार माध्यमाना यासंदर्भात माहिती दिली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी हे पत्र ट्वीट करत महाराष्ट्र सरकारला साहाय्य करण्याचे आवाहन केले होते. विवेक रहाडेच्या आत्महत्येला सरकार वेगळे वळण देत आहे. उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्र पीडित कुटुंबावर सरकार दडपशाही करत असेल तर कदापिही मराठा समाज सहन करणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी म्हटले. राज्य सरकार विषयाला डायव्हर्ड करत असेल तर सरकारला मराठा समाजाच्या तीव्र रोशला समोर जावे लागेल, असा धमकी वजा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी दिला. आज आमच्या तरुण युवकांनी बलिदान दिले. त्या बलिदाच्या विषयाला डायव्हर्ड करत असाल तर कदापिही मराठा समाज खपून घेणार नाही सरकारला महागात पडेल, असेही ते म्हणाले. विवेक राहाडेची कथित सुसाईट नोट नकली असल्याचे पोलिसांनी म्हटले. तर विवेक रहाडे आत्महत्या प्रकरणात उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलिस दडपशाही करत असून ते खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने इशारा दिला आहे. पोलिसांनी तपासात केलेल्या दाव्यानंतर आता मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आणि पोलिस प्रशासन आणि मराठा समन्वयक असा नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज या पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.