सेवानिवृत्त शिक्षकाचा भरदिवसा दगडाने ठेचून खून

खुनानंतर आरोपी स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर, त्याला अटक

0

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात बार्शीतील आगळगाव ते उम्बर्गे या रोडवर कळंबवाडी येथील रहिवासी  सेवानिवृत्त शिक्षक त्र्यंबक उमाप यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खुनानंतर आरोपी स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

कळंबवाडी येथील रहिवासी त्र्यंबक उमप असे हत्या झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्र्यंबक हे आपल्या शेतातील उडीद पिकाची पट्टी घेण्यासाठी बार्शी बाजार समिती या ठिकाणी जात होते. यावेळीच आगळगाव ते उम्बर्गे या रस्त्यावर संशयित आरोपी बिभीषण विश्वनाथ उमप आणि त्याचे वडील विश्वनाथ बाबू उमप या दोघा बाप-लेकांनी त्यांची गाडी अडवून जोरदार भांडण केले. या दोघांचे जोराचे भांडण सुरू असल्याचे सुमंत उमाप यांनी तक्रारदारास फोन वरून सांगितले असता, ते तात्काळ दुसरी दुचाकी घेऊन गुन्हा झालेल्या ठिकाणी पोहोचले. यावेळी त्यांना त्यांचे वडील त्र्यंबक उमाप हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले तसेच वरून दोघेही आरोपी लाथाबुक्क्यांनी दगडाने त्यांना मारत असल्याचे  गणेश उमप यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर घटनेनंतर आरोपी बिभीषण उमप आणि विश्वनाथ उमप यांच्या विरोधात बार्शी पोलिस स्टेशन या ठिकाणी हजर झाले असून पुढील तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्रंबक यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.