रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचा भीमशक्ती रोजंदारी कर्मचारीच्या लाक्षणिक धरणे आंदोलनास पाठिंबा

भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन

0

औरंगाबाद  :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनच्या वतीने ता.17 फेब्रुवारी राेजी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनच्या वतीने ता.17 फेब्रुवारी राेजी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना विद्यापीठ फंडातून एकत्रित वेतनावर कायम करण्यात यावे, समान काम समान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, संजय निंबाळकर समिती बरखास्त करण्यात यावी, थकीत पी.एफ. व्याजासहित देण्यात यावा, नवीन निविदा प्रक्रियेतील वयाची व शिक्षणाची अट रद्द करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते श्रावण गायकवाड, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम, जिल्हाध्यक्ष ॲड.अतुल कांबळे, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुणरत्न सोनवणे, विकास रोडे, रत्नदीप कांबळे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.