शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, राज्यभर काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

0

वर्धा : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन करत आहे. मोदी सरकारने तीन नवे कृषी कायदे तयार केले आहेत. या काद्यांना काँग्रेससह देशातील काही शेतकरी संघटना विरोध करत आहेत. ‘एक देश, एक बाजार समिती’ या संकल्पनेला प्रोत्साहन देण्याचे हे कायदे असल्याचे सरकारचे म्हणणे असून या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री कुठेही करता येईल, असे सरकारच्या वतीने सरकारचा दावा आहे.

मोदी सरकारने तीन नवे कृषी कायदे तयार केले आहेत. या काद्यांना काँग्रेससह देशातील काही शेतकरी संघटना विरोध करत आहेत. ‘एक देश, एक बाजार समिती’ या संकल्पनेला प्रोत्साहन देण्याचे हे कायदे असल्याचे सरकारचे म्हणणे असून या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री कुठेही करता येईल, असे सरकारच्या वतीने सरकारचा दावा आहे.या कायद्यांमुळे कृषी क्षेत्रही भांडवलदारांच्या किंवा कॉर्पोरेट कुटुंबाच्या हातात जाईल, आणि शेतकऱ्यांना याचा फटका बसेल, असे विरोधक म्हणत आहेत. याच मुद्द्यावरून आज काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात वर्ध्यामध्ये आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात आज सेवाग्राम येथे कॉंग्रेसच राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आंदोलनामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस इत्यादी नेते उपस्थिती आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.