प्रख्यात सुवर्ण व्यावसायिक रतनलाल सी. बाफना यांचे निधन

आज पाडव्याच्या दिवशी रतनलाल बाफना यांनी अखेरचा श्वास घेतला

0

जळगाव :  देशातील प्रख्यात सुवर्ण व्यावसायिक आणि शाकाहार, सदाचारचे प्रणेते म्हणून ओळख असलेले रतनलाल सी बाफना  यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

देशातील प्रख्यात सुवर्ण व्यावसायिक आणि शाकाहार, सदाचारचे प्रणेते म्हणून ओळख असलेले रतनलाल सी बाफना  यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. वयाच्या 86 व्या वर्षी  आज पाडव्याच्या दिवशी रतनलाल बाफना यांनी अखेरचा श्वास घेतला. सोने-चांदीच्या व्यवसायात रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स हा ब्रँड रतनलाल बाफना यांनी नावारुपास आणला आहे. रतनलाल बाफना यांचा जन्म राजस्थानमधील भोपालगड येथे झाला. 10 पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते  जळगावात दाखल झाले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी राजमल लखीचंद ज्वेलर्स इथं नोकरी केली होती. नोकरी करत असताना त्यांनी सोन्याच्या व्यवसायातील कसब हस्तगत केला होता. या कामात सर्वात महत्त्वाचा असणारा विश्वास त्यांनी लोकांचा जिंकला होता. तब्बल 19 वर्ष त्यांनी नोकरी केली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 1974 मध्ये त्यांनी नोकरी सोडून दिली आणि स्वत: च्या नावाने म्हणजे आर. सी. बाफना ज्वेलर्स  हे दुकान सुरू केले. 1974 मध्ये लावलेले रोपटे आज वटवृक्षात रुपांतरित झाले आहे. महाराष्ट्रासह देशभरात आर. सी. बाफना ज्वेलर्सची अनेक दुकानं सुरू करण्यात आली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.