प्रख्यात समीक्षक डॉ. जी. एस. अमुर कालवश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी इंग्रजी विभागप्रमुख डॉ. जी. एस. अमुर

0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी इंग्रजी विभाग प्रमुख : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. जी. एस. अमुर यांचे बेंगलोर येथे निधन झाले. विद्यापीठात १९६९ ते १९८५ दरम्यान त्यांनी आपली सेवा बजावली.डॉ. अमुर हे मूळचे कानडी होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. जी. एस. अमुर यांचे बेंगलोर येथे निधन झाले. विद्यापीठात १९६९ ते १९८५ दरम्यान त्यांनी आपली सेवा बजावली.डॉ. अमुर हे मूळचे कानडी होते. औरंगाबादमध्ये त्यांनी सोळा वर्षे शिक्षण क्षेत्रात सेवा दिली. विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात कार्यरत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमधून अनेक आयएएस, आयपीएस या व्यतिरिक्त इतरही भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी त्यांनी  घडवले. वर्कशॉप, सेमिनारच्या निमित्ताने त्यांनी देशभरातील अनेक लेखक, कवींना औरंगाबादेत आणले. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ झाला. इंग्रजी, हिंदी आणि कन्नड या तिन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी कन्नड भाषेत अनेक ग्रंथ लिहिले. याची दखल घेत दिल्लीच्या साहित्य अकादमीचा कन्नड भाषेतील पुरस्कारही त्यांना मिळाला होता. उच्च दर्जाचे समीक्षक, लेखक, प्रशासक, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, अशी त्यांची कारकीर्द राहिली. इंग्रजी विभागातर्फे विभाग प्रमुख डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. मुस्तजीब खान, आनंद उबाळे, मेहरुन्निसा पठाण आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.