Realme X7 आणि Realme X7 Pro 5G भारतात ४ फेब्रुवारीला होणार लाँच

रियलमी भारतात आपली पुढील एक्स सीरीज स्मार्ट फोनला लाँच करण्याच्या तयारीत

0

नवी दिल्ली :  हँडसेट निर्माता कंपनी रियलमी भारतात आपला नेक्स्ट एक्स सीरीज स्मार्टफोनला लाँच करण्याच्या तयारीत आहे. अनेक टीझर आणि लीक्स समोर आल्यानंतर आता अंततः रियलमीने आपली आगामी Realme X7 आणि Realme X7 Pro 5G स्मार्टफोनची लाँचिंग तारीख कन्फर्म केली आहे.
सध्या कंपनीने रियलमी एक्स ७ आणि रियलमी एक्स ७ प्रो ५ जीची लाँचिंग तारीख कन्फर्म केली आहे. परंतु, या फोनच्या सेलवरून अद्याप पडदा हटवला गेला नाही. Realme X7 Pro, Realme X7 स्मार्टफोन लाँचिंग मिळालेल्या माहितीनुसार, मीडिया इनवाइट शिवाय रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून लाँचिंग तारीख कन्फर्म केली आहे. रियलमीचे हे दोन्ही स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता (साडे बारा वाजता) लाँच करण्यात येतील. Realme X7 Pro फोनचे फीचर्स कन्फर्म  रियलमीच्या अधिकृत वेबसाइटवर रियलमी एक्स आणि एक्स ७ प्रो दोन्हींसाठी वेगळे पेज तयार केले आहे. फोनच्या काही प्रमुख वैशिष्ट्ये या पेजवर कन्फर्म केले आहे. रियलमी एख्स ७ प्रो ५ जी स्मार्टफोनमध्ये डायमेंसिटी १००० प्लस ५जी प्रोसेसर असणार आहे. याशिवाय फोनचे वजन १८४ ग्रॅम, फोनमध्ये १२० हर्ट्ज सुपर अमोलेड फुल स्क्रीन, ५ वॉट सुपरडार्ट चार्ज सपोर्ट मिळणार आहे. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला असून यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, तसेच ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा सेन्सर दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी यात ४३०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ही ५० वॉट सुपरडार्ट चार्ज सपोर्ट करणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.