‘तिवरे धरणा’ची होणार पुनर्बांधणी, भूगर्भतज्ज्ञांच्या अहवालानंतर मंजुरी

धरणाच्या ठिकाणच्या कातळाची खोली आणि दर्जा तपासला जाणार

0

रत्नागिरीः गेल्या वर्षी 2 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास तिवरे धरण फुटले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. तिवरे धरण फुटल्याने 23 जणांना प्राण गमवावे लागले. आता रत्नागिरीतील त्याच तिवरे धरणाची पुनर्बांधणी होणार आहे.

तिवरे धरण फुटले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. तिवरे धरण फुटल्याने 23 जणांना प्राण गमवावे लागले. आता रत्नागिरीतील त्याच तिवरे धरणाची पुनर्बांधणी होणार आहे. . फुटलेल्या तिवरे धरणाच्या भूगर्भीय अहवालाची तयारी सुरू करण्यात आली असून, धरणाच्या ठिकाणच्या कातळाची खोली आणि दर्जा तपासला जाणार आहे. धरणाच्या ठिकाणी 11 बोअर मारून तपासणी सुरू करण्यात येणार आहे. भूगर्भतज्ज्ञांच्या अहवालानंतर धरणाच्या कामाला मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तिवरे धरण दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. यात जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे हे या पथकाचे प्रमुख होते. या पथकामध्ये जलसंधारण विभागातील मुख्य अभियंता (लघुसिंचन), रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांचा समावेश होता.  तिवरे धरण फुटल्याने भेंदवाडीतील 23 जणांचा बळी गेला होता. या दुर्घेटनेच्या तपासणीसाठी सरकारने एसआयटी नेमली होती. या चौकशी समितीने तपास करुन अपला अहवाल तयार केला होता.

तिवरे धरण दुर्घटना
कोकणातील तुफान पावसाने जुलै महिन्यात चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले. चक्क धरण फुटल्याने पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने अनेक जण वाहून नेले. 2 जुलैच्या रात्री ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेने थरकाप उडाला. धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरे वाहून गेली. तर आजूबाजूच्या गावात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. चक्क धरण फुटल्याने धरण क्षेत्रात येणाऱ्या ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावात पाणी घुसले. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की या त्यामध्ये 24 नागरिक वाहून गेले. अनेक घरात पाणी घुसले. प्रापंचिक साहित्य विस्कटून गेले. धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरे वाहून गेली. तर आजूबाजूच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली. फुटलेल्या तिवरे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2 हजार 452 दशलक्ष घनफूट इतकी होती. या धरणाची लांबी 308 मीटर तर उंची 28 मीटर होती. 2004 मध्ये या धरणातील गाळ उपसण्यात आला होता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.