राशनचा तांदूळ, गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असलेला टेम्पो पोलिसांनी पकडला

शिल्लेगाव पोलिसांनी सापळा रचून टेम्पोसह 80 गोणी तांदूळ, 26 गव्हाच्या गोण्या ताब्यात

0

लासूर स्टेशन : राशनचा तांदूळ, गहू अहमदनगर येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेला टेम्पो लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शिल्लेगाव पोलिसांनी पकडून टेम्पोसह त्यामधील 80 गोण्या तांदूळ, 26 गव्हाच्या गोण्या ताब्यात घेतला.

शिल्लेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथून राशनचा तांदूळ, गहू अहमदनगर येथे हा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय सूत्राकडून मिळाली होती. यांची शिल्लेगाव पोलिसांनी दखल घेत सापळा रचला. मंगळवारी (ता. 23) तीन वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन येथील बाजार समिती समोरुन अहमदनगरकडे जात असलेला टेम्पो 407 टेम्पो (नंबर एम एच 15 , बी. जे. 3245) पोलिसांनी पकडला. चालक अक्षय सुखदेव मोगल (रा साकेगाव, ता वैजापूर जि औरंगाबाद) असे चालकाचे नाव आहे. चालक अक्षय याच्या सांगण्यावरून किसनलाल कोठारी (रा बोलठाण, ता नांदगाव, जि नाशिक) यांचा माल आहे, अशी कबुली दिली. या टेम्पोत 80 गोण्या तांदूळ, 26 गोण्या गहूसह टेम्पो शिल्लेगाव पोलिस ठाण्यात जमा केला व गंगापूर तहसील कार्यालयाला शिल्लेगाव पोलिसांनी माहिती दिली असून तहसील विभागाचे अधिकारी आल्यावर पंचनामा होणार आहे. ही कारवाई शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपनिरीक्षक अमोल ढाकणे,पो नाईक मनोज औटे सह पोलिस पथकाने केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.