मजुरी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ठेकेदारावर अॅट्रॉसिटी दाखल
रायगड येथे आदिवासी मुलीवर ठेकेदाराने बलात्कार आणि जातीवाचक शिवीगाळ
रायगड : रायगड येथे मजुरी करणाऱ्या आदिवासी अल्पवयीन मुलीवर ठेकेदाराने बलात्कार आणि जातीवाचक शिवीगाळ केली . ही घटना जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली येथे घडली. याबाबत गुरुवारी (8 ऑक्टोबर) रात्री साडेअकरा वाजता पाली पोलिस स्थानकात ठेकेदारा विरोधात बलात्कार, अॅट्रॉसिटी आणि पॉस्कोअतंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली येथे घटना घडली. गुरुवारी 8 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजता पाली पोलिस ठाण्यात ठेकेदाराविरोधात बलात्कार, अॅट्रॉसिटी आणि पॉस्कोअतंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या ठेकेदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सर्व चौकशी करून शुक्रवारी 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी अटक केली, असे पाली पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांनी सांगितले. याबाबत पाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित 16 वर्षीय आदिवासी मुलगी सध्या पाली येथील डहाणू या बिल्डिंगमध्ये बांधकाम मजुरीचे काम करत होती. तेथील ठेकेदार नितीन महादू पाटील (वय 34) हा सुद्धा तेथे काम करत होता. ठेकेदाराने 1 जानेवारी 2019 ते 6 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पाली बल्लाळेश्वर मंदिरासमोरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खोलीत अल्पवयीन आदिवासी मजूर मुलीवर वारंवार बलात्कार करून जातीवाचक शिवीगाळ करायचा. तसेच यासंदर्भात कोणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकीदेखील दिली होती. याबाबत सदर अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पाली पोलिसांनी ठेकेदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास रोहा उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी करत आहेत.