खरगौनमधील झिरन्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

त्या तरूणांनी बलात्कार केल्यावर, तिची पाठ आणि पाय मोडल्याची माहिती

0

भोपाळ : उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेने देश ढवळून निघाला असताना मध्य प्रदेशमध्येही  खरगौनमधील झिरन्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीने मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली.

अल्पवयीन मुलगी आपल्या भावाबरोबर शेतीची राखण करण्यासाठी आली होती. शेताची राखण करणाऱ्या मुलीवर तीन जणांनी बलात्कार केला. पाणी पिण्याच्या बहाण्याने आरोपी शेतावर आले होते. भावाला मारहाण करत आरोपींनी त्याच्या बहिणीला पळवून घेऊन गेले आणि बलात्कार केला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.    दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील गरीब तरूणीच्या बलात्काराची घटना ताजी असतानाच राज्यातील बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोघा तरूणांनी तिच्यावर बलात्कार केला. ते एवढ्यावर न थांबता तिची तिची पाठ आणि पाय मोडल्याची माहिती समोर आली आहे. पीडित तरूणीला रिक्षात बसवून तिच्या घरी पाठवून दिले. परंतु त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.