राणेंचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान, उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता!

तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो, असे ट्विट करत निलेश राणेंनी सोडले टीकास्त्र

0

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणे पितापुत्रांवर केली. त्यानंतर नारायण राणेंचे दोन्ही पुत्र चांगलेच खवळले आहेत. माजी खासदार निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला आहे.

नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केले. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल 1 वाक्य, पण बिहारवर 20 मिनिटे. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो, असे ट्विट करत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. तत्पूर्वी नितेश राणेंनीही ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला होता. दुसऱ्यांची पिल्ले वाईट…मग त्यांनी काय डीआयएनओच्या खुशीत नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रावणबाळ” जन्माला घातला आहे का? अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. इतकी खुमखुमी आहे ना मग ती दिशा सालिनची केस मुंबई पोलिसांवर कुठलाही दबाव न टाकता नि:पक्षपाती चौकशी करु द्या.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!,” अशी टीका नितेश राणे यांनी अधिकृत ट्विटरवरुन केली. “बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखानी “व्हॅक्सीन” घेतलेली दिसते. जास्तच हवा भरलेली आज, किती आव, ‘टाचणी’ तैयार आहे.. फक्त योग्य वेळ येऊन द्या,” अशी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केली.

राणे पितापुत्रांवर काय म्हणाले होते उद्धव ठाकरे

काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पोरे डराव डराव करत आहेत. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झाला, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. राज्यात काहीजणांना माणसांची इंजेक्शन्स लागू पडत नाहीत. त्यांना गुराढोरांची इंजेक्शन्स लागतात. गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, अशी टीकासुद्धा उद्धव ठाकरेंनी केली होती. काही लोकांना सत्तेचे स्वप्न पडत आहेत. अनेक दिवसांपासून सत्ता पाडण्याचे ऐकत आहे. हिंमत असेल तर सरकार पाडा, आम्ही तुमच्या सारखे गुळाच्या ढेपेला चिटकलेले मुंगळे नाहीत. वाटेला जाल तर काय ते दाखवून देऊ, असं आव्हानच त्यांनी नाव न घेता राणेंना दिले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.