शासकीय इतमामात रामविलास पासवान यांच्यावर आज अंत्यसंस्कार

एस्कॉर्ट्स रुग्मणालमध्ये त्यांनी 74 व्या वर्षी घेतला अ्खेरचा श्वास

0

पाटणा : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले .  केंद्रीय कायदा आणि विधि मंत्री रविशंकर प्रसाद हे पाटण्यातील या अंत्यसंस्कारावेळी केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व केले. पासवान यांचे पार्थिव आज दुपारी 12.30 वाजता त्यांच्या पाटण्यातील निवासस्थान कृष्णा पुरीवरून जनार्दन घाट (दीघा) येथे आणले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले होते.

रामविलास पासवान यांचे पार्थिव पार्थिव शुक्रवारी रात्री पाटण्याला नेण्यात आले. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. पाटण्यात  विधानसभा आणि पार्टी ऑफिसमध्ये पासवान यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी पुष्प अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. गुरुवारी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले. दिल्लीतील एस्कॉर्ट्स रुग्णालयामध्ये त्यांनी 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू  होते. शनिवारी त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रामविलास पासवान यांची राजकीय कारकिर्द
रामविलास पासवान लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष होते. बिहारमधून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पासवान यांनी बी.ए. आणि त्यानंतर एल.एल.बी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. पोलिस सेवेत नोकरी मिळाल्यानंतर ती न स्वीकारता त्यांनी राजकीय मार्ग स्वीकारला. विश्वनाथ प्रताप सिंह, एचडी देवगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह आणि आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली. पहिल्यांदा ते 1969 मध्ये ते बिहार विधानसभेवर निवडून आले. राम विलास पासवान यांनी 32 वर्षांत 11 निवडणुका लढल्या आणि त्यापैकी 9 जिंकल्या. देशाच्या सहा पतप्रधानांसोबत काम करण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावे आहे. 1989 मध्ये ते पहिल्यांदा व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर एच. डी. देवेगौडा यांच्या मंत्रिमंडळातही ते होते. गुजराल सरकारमध्ये त्यांनी रेल्वेमंत्री पदाचा कारभार पाहिला.
रामविलास पासवान आठ वेळा लोकसभा सदस्य आणि विद्यमान राज्यसभेचे खासदार होते. संयुक्त समाजवादी पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली आणि 1969 मध्ये ते पहिल्यांदा बिहार विधानसभेवर निवडून गेले. 1977 मध्ये हाजीपूर मतदारसंघातील जनता पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. त्यानंतर ते 1980, 1989, 1996, 1998, 1999, 2004 आणि 2014 मध्ये खासदार राहिले. त्यानंतर 2000 मध्ये  त्यांनी लोक जनशक्ती पार्टीची स्थापना केली. त्यानंतर 2004 मध्ये ते सत्तेत असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये सामील झाले आणि रसायन व खते मंत्रालय आणि पोलाद मंत्रालयामध्ये केंद्रीय मंत्री राहिले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.