राजीव गांधींच्या मित्राचे निधन, पार्थिवाला खांदा देण्यासाठी धावले राहुल गांधी !

माजी केंद्रीय मंत्री सतीश शर्मा यांचे निधन. शुक्रवारी शर्मा यांच्यावर करण्यात आले अंत्यसंस्कार

0

नवी दिल्ली :माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे मित्र आणि माजी केंद्रीय मंत्री सतीश शर्मा यांचे निधन 17 फेब्रुवारीला झाले. शुक्रवारी शर्मा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्यावेळी राहुल गांधी यांनी सतीश शर्मा यांच्या पार्थिवाला खांदा दिला.

कॅप्टन सतीश शर्मा हे गांधी परिवाराचे निकटवर्तीय होते. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. त्यावेळी शर्मा यांच्या पार्थिवाला राहुल गांधी यांनी खांदा दिला. सतीश शर्मा यांचे निधन 17 फेब्रुवारीला गोवा येथे झाले होते. ते 73 वर्षांचे होते. सतीश शर्मा हे कर्करोगाने त्रस्त होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. ‘कॅप्टन सतीश शर्मा यांच्या निधनाची बातमी ऐकुन दु:ख झाले. त्यांचा परिवार आणि मित्रांसोबत माझ्या संवेदना आहेत. आम्ही त्यांना कायम स्मरणात ठेवू’, असे ट्वीट करुन राहुल गांधी यांनी सतीश शर्मा यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सतीश शर्मा यांची राजकीय कारकिर्द

सतीश शर्मा हे गांधी परिवाराचे निकटवर्तीय होते. त्यांनी गांधी परिवाराचा हक्काचा मतदारसंघ असलेल्या रायबरेली आणि अमेठी या दोन्ही ठिकाणचे प्रतिनिधीत्व केले आहे. सतीश शर्मा हे 3 वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. तर 3 वेळा त्यांनी राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली होती. सतीश शर्मा हे राजीव गांधी यांच्या खूप जवळचे स्नेही मानले जायचे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशच्या सिकंदराबादमध्ये 11 ऑक्टोबर 1947 ला झाला होता. सतीश शर्मा हे पायलट होते. 1991 मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर सतीश शर्मा यांनी अमेठीतून निवडणूक लढवली आणि रेकॉर्ड मतांनी विजयही मिळवला होता. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये सतीश शर्मा हे प्रट्रोलियम मंत्री होते.

पायलटची नोकरी सोडून राजकारणात

राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळ्यानंतर सतीश शर्मा यांनी पायलटची नोकरी सोडली आणि राजीव गांधी यांच्या कमिटीमध्ये सहभागी झाले. राजीव गांधी पंतप्रधान असताना सतीश शर्मा हे अमेठी, रायबरेली आणि सुलतानपूर या 3 मतदारसंघाची जबाबदारी सांभाळत होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.