‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनच्या तुटवड्याची राजेश टोपेंकडून दिली माहिती…

शरद पवार यांनी तात्काळ एक हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून केली व्यवस्था

0

मुंबई : राज्यात ‘रेमडेसिवीर’चा  तुटवडा भासत असल्याचे  बातमी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती, अशी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही याबाबतची माहिती दिली होती. या माहितीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तात्काळ एक हजार इंजेक्शन्स उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली आहे. शरद पवार यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली .

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जनता दरबार उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित असतानाच अचानक शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी सर्वप्रथम गरजू आणि गरीब जनतेसाठी या ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन्सचा वापर करा, अशी सूचनाही शरद पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली. दरम्यान कार्यतत्पर आणि जनतेची काळजी करणारा नेता कसा असावा, याचे पुन्हा एक नवे उदाहरण शरद पवार यांनी घालून दिले आहे.

राजेश टोपे काय म्हणाले होते.

“रेमिडीसीवर हे अँटीव्हारयल इंजेक्शन आहे. या इंजेक्शन निर्मात्या ज्या काही कंपन्या आहेत. त्यातील काही बॅचेसमध्ये त्रुटी निर्माण झाल्यामुळे केंद्रीय मंत्रालयाच्या ड्रग कंट्रोल अॅथोरीटीने त्या बॅचेस रद्द केल्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज तात्पुरता तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा निश्चितप्रकारे सुरळीत होईल. राज्य सरकार, सार्वजनिक आरोग्य विभागाने याचे मोठ्या पद्धतीने ऑर्डर दिल्या आहेत”, असे राजेश टोपे यांनी सांगितले होते. “निर्माता कंपन्यांच्या बॅचेस रद्द केल्यामुळे हा तात्पुरता स्वरुपाचा तुटवडा निर्माण झाला आहे. दोन दिवसांच्या आत या गोष्टी सुरळीत होतील. कारण त्या कंपनीच्या एमडींसोबतही आमची चर्चा झाली आहे”, असेही टोपेंनी सांगितले. “तुटवडा झाला म्हणून काळाबाजार करून पैसे कमवावे, असे होऊ नये म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. सरकारला 2200 रुपये इतक्या स्वस्त दरात याची विक्री करण्याची आवश्यकता आहे”, असे टोपेंनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.