‘राजस्थान रॉयल्स’ची तिसरी विकेट पडली, बटलरनंतर संजू सॅमसन आऊट

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

0

आबुधाबी  : बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आबुधाबी येथे खेळला जात आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी या सत्रात 2-2 सामने जिंकले आहेत.संजू सॅमसन आणि रॉबिन उथप्पा क्रीजवर आहे. जोस बटलर 22 रन बनवून नवदीप सॅनीच्या बॉलवर आउट झाला.

राजस्थानला मागील सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने पराभूत केले होते. तर बंगळुरूने मागील सामना मुंबईविरोधात सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता. अशात दोन्ही संघांकडे तिसरा सामना जिंकत गुणतालिकेत वर पोहचण्याची संधी आहे. सध्या राजस्थान 5व्या आणि बंगळुरू 6 व्या स्थानावर आहे. दोन्ही संघाचे 4-4 गुण आहेत. राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, रियान पराग, राहुल तेवतिया, टॉम करन, श्रेयस गोपाल, जोफ्रा आर्चर, महिपाल लोमरोर आणि जयदेव उनादकट. रॉयल चँलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, एरॉन फिंच, एबी डिव्हिलियर्स (यष्टिरक्षक), शिवम दुबे, गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, इसुरु उडाना, नवदीव सैनी, अॅडम झॅम्पा आणि यजुवेंद्र चहल.

बंगळुरूकडे पर्याय कमी आहेत

बंगळुरू टीममध्ये यष्टिरक्षक म्हणून जोसुआ फिलिपची जागा अडचणीची आहे. यष्टिरक्षणासह फलंदाजी डिव्हिलर्सला थकवत आहे. अशात टीम पार्थिव पटेल आणि अष्टपैलू मोइन अलीला संधी देऊ शकते. वेगवान गोलंदाज मॉरिस तंदुरुस्त होणे संघासाठी बोनस ठरेल, कारण डेल स्टेन व उमेश यादव खूप धावा देताय. मात्र, सर्वाधिक चर्चा कर्णधार विराट कोहलीच्या फार्मची आहे. कर्णधार कोहलीने आतापर्यंत सुमार कामगिरी केली. त्याला अद्याप आपली छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे संघासाठी चिंता निर्माण झाली आहे. ही स्पर्धेची सुरुवात असून अबुधाबीतील पहिल्या सामन्यात बंगळुरूसाठी कोहली व चाहत्यांसाठी चांगली बातमी येऊ शकते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.