राज ठाकरेंची मनसेच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक; आगामी निवडणुकांसाठी चक्रव्यूह

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सक्रिय, पक्षातील पदाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना

0

मुंबई : राज्यातील आगामी ग्रामपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत  आज मंगळवारी मनसेची महत्त्वाची बैठक आहे.  राज ठाकरे  यांनी मनसेचे प्रमुख नेते आणि सरचिटणीसांना या बैठकीसाठी बोलावले आहे. सकाळी 10 वाजता राज ठाकरे वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये या बैठकीला सुरुवात होईल.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत  आज मंगळवारी मनसेची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.  राज ठाकरे  यांनी मनसेचे प्रमुख नेते आणि सरचिटणीसांना या बैठकीसाठी बोलावले आहे. सकाळी 10 वाजता राज ठाकरे वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये या बैठकीला सुरुवात होईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. काही दिवसांत ‘कृष्णकुंज’वर बैठकांचे सत्र सुरू आहे. या बैठकांमध्ये राज ठाकरे विविध जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत आहेत. सोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचनाही देत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा जोमाने उतरेल, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली. राज ठाकरे या बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्याशी वैयक्तिक संवाद साधणार आहेत. पक्षातील पदाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना काय आदेश देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले. राज्य सरकारने नुकताच राज ठाकरे यांच्यासह राज्यातील प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे यांची झेड  दर्जाची सुरक्षा काढून घेऊन त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यानंतर मनसेच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर सडकून टीका होत आहे.

ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा, राज ठाकरेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना आगामी ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचे आदेश दिले होते. जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यासाठी वेळ पडल्यास स्थानिक पातळीवर इतर पक्षांशी युती करण्याची रणनीती मनसेकडून आखली जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.