राज ठाकरे, पवारांची चौकशी लागली, मग दानवे शुद्ध घीवाले आहेत काय?, बच्चू कडूंचा सवाल

लोकशाही आणि घटनेची पायमल्ली करण्याचा प्रकार निश्चितच होत आहे, आम्ही करतो त्याचा निषेध

0

अमरावती :  ईडीची चौकशी लावून केंद्र सरकार लोकशाही आणि घटनेची पायमल्ली करत आहे, भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का नाही?, असा सवाल शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला. राज ठाकरेंवर याआधी चौकशी लावली. आता प्रताप सरनाईकांवर चौकशी लावली. शरद पवारांचीही चौकशी लावली, मग दानवे काय शुद्ध घीवाले आहेत काय?, असे टीकास्त्र शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंनी सोडले आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लावून केंद्र सरकार लोकशाहीची आणि घटनेची पायमल्ली करत आहे, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. भाजपच्या काही लोकांनी कित्येक मोठी संपत्ती जमा केली आहे, एकाही भाजपच्या नेत्यावर ईडीची चौकशी का लागत नाही?, याआधी राज ठाकरे यांच्यावर चौकशी लागली, शरद पवारांवर चौकशी लागली, आता प्रताप सरनाईक यांच्यावर चौकशी लागली, मग रावसाहेब दानवे का शुद्ध घी वाले आहेत का, असा संतप्त सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला.  केंद्राकडून याचे राजकारण होत आहे. जो बोलण्याचा प्रयत्न करतो, त्याला दाबण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाही आणि घटनेची पायमल्ली करण्याचा प्रकार निश्चितच होत आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो, असेसुद्धा बच्चू कडू म्हणाले.

गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वॉरंटाईन राहावे लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असे सरनाईक यांनी ईडीला कळवले होते. ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचे कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.