हिंंगोलीत दोन आठवड्यांनंतर पावसाची पुन्हा हजेरी, खरिपाची पिके सुरक्षित
जिल्ह्यातील सर्व दूर भागात कुठे रिपरिप तर कुठे मुसळधार पाऊस
हिंगोली : हिंगोलीत तब्बल दोन आठवड्यांहून अधिकच्या विश्रांतीनंतर काल मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील सर्व दूर भागात कुठे रिपरिप तर कुठे मुसळधार असा हा पाऊस पडत आहे.
हिंगोलीत तब्बल दोन आठवड्यांहून अधिकच्या विश्रांतीनंतर काल मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सर्व दूर भागात कुठे रिपरिप तर कुठे मुसळधार, असा पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव तालुक्यातील बहुतांश भागात सोयाबीन, उडीद, मूग आदी पिके सुकायला लागली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मूग व उडिदला शेंगा आलेल्या असल्यामुळे व सोयाबीनला फुले येत असल्याने पावसाची या पिकाला अत्यंत गरज होती. काल रात्रीपासून सुरू झालेल्या या पावसाने या पिकांना जणू संजीवनीच मिळाली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या देखील आशा पल्लवित झाल्या आहेत शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे..