लासूर स्टेशन येथे ‘किसान सभा’ व लालबावटा शेतमजूर युनियनचे रेल्वे रोको आंदोलन

कार्यकर्त्यांनी मांडला ठिय्या, जनशताब्दी एक्सप्रेस अडवणाऱ्या 49 कार्यकर्त्यांना अटक

0

लासूर स्टेशन : संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार आज देशव्यापी रेल रोको आंदोलनाचा भाग म्हणून किसान सभा, लालबावटा शेतमजूर युनियन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने लासुर स्टेशन येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले.

संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार आज देशव्यापी रेल रोको आंदोलनाचा भाग म्हणून किसान सभा, लालबावटा शेतमजूर युनियन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने लासुर स्टेशन येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी नऊ वाजेपासून किसान सभा व शेतमजूर युनियनच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनवर निदर्शने सुरू केली होती तसेच साडेदहा वाजता जनशताब्दी एक्सप्रेस लासूर स्टेशनला येताच तिच्यासमोर रूळावरच कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. शेवटी लोहमार्गावर गाडीच्या पुढेच ठाण मांडून बसणाऱ्या ८ महिला वगळता सर्व ४९ पुरुष कार्यकर्त्यांना बळाचा वापर करून लोहमार्गावरून पोलिसांनी हटवले व ताब्यात घेतले. या सर्व कार्यकर्त्यांना प्रथम लासूर स्टेशन येथील पोलिस चौकीत नेण्यात आले. तेथे दोन तास बसवून ठेवल्यानंतर रेल्वे पोलिसांच्या औरंगाबाद येथील मुख्यालयात सर्वांना आणण्यात आले. तसेच औरंगाबादेत रेल्वे पोलिस मुख्यालयात दिवसभर थांबवून ठेवण्यात आले. लासुर स्टेशन, गाजगाव, खादगाव, देरडा,धामोरी, कोपरगाव, गोळवाडी, दहेगाव, सिंधी सिरजगाव, कलीम टाकळी या दहा गावांतील किसान सभा व शेतमजूर युनियनचे कार्यकर्ते या रेल्वे रोको सहभागी झाले होते. आंदोलन करणार्‍या सुमारे 100 जणांपैकी आठ महिला वगळता 49 पुरुषांना रेल्वे पोलिसांनी व शिल्लेगाव पोलिस ठाण्याने पोलिसांनी अटक केली. लासुर स्टेशन पोलिस चौकी येथे दोन तास ठेवून वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर सर्व 49 जणांना औरंगाबाद येथील रेल्वे पोलिस मुख्यालयात आणण्यात आले.
तीन कृषी कायदे रद्द करा किमान आधारभूत भावाचा नवीन कायदा करा, राशन व्यवस्था वाचवा दिल्ली येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवरील दडपशाही थांबवा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या व घोषणा देण्यात आल्या. जनशताब्दी एक्सप्रेस या रेल्वेचा लासुर स्टेशन येथे थांबा नसतानाही धावती रेल्वे शेकडो कार्यकर्त्यांनी अडवली.
अच्छा आंदोलनाचे नेतृत्व लालबावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय पंच सदस्य कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती, किसान सभेचे जिल्हा सचिव कैलास कांबळे, जिल्हा धरणग्रस्त समितीचे भाऊसाहेब शिंदे किसान सभेचे गंगापुर तालुका पुढारी विलास शेंगुळे व सुरेश शेंगुळे महाराज, दौलतराव मोहिते, दत्तू काळवणे यांनी केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.