ड्रग पेडलरच्या घरी छापा; ‘एनसीबी’च्या पथकावर हल्ला, समीर वानखेडेसह तीन अधिकारी जखमी
अटक केलेल्या तीन आरोपींकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त
मुंबई : मुंबईतील गोरेगाव भागात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थातच ‘एनसीबी’च्या पथकावर हल्ला झाला. यात चार अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. माहितीनुसार 50 ते 60 जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाचे दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबईतील गोरेगाव भागात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थातच ‘एनसीबी’च्या पथकावर हल्ला झाला. यात चार अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. 50 ते 60 जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाचे दोन अधिकारी गंभीर जखमी झाले. एनसीबीचे एक पथक ड्रग पॅडलर कॅरी मँडिसला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. या पथकाने छापा टाकताच कॅरीच्या सहका-यांनी एनसीबीच्या पथकावर दगड आणि काठीने हल्ला चढवला. मात्र, एनसीबीच्या पथकाने शौर्य दाखवत कॅरीचे सहकारी विपुल आगरे, युसुफ शेख आणि अमीन अब्दुल यांना अटक केली आहे. अटक केलेल्या तीन आरोपींकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांची अनेक पथके या भागात छापा टाकत आहेत. याक्षणी परिस्थिती नियंत्रणात आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.