राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांची अडवून धक्काबुक्की
हाथरसच्या पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन; राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अटक
करमाड : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस येथे निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व त्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून पीडितेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील, असा इशारा औरंगाबाद काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रामराम शेळके यांनी दिला आहे.
उत्तर प्रदेशामधील हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस येथे निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व त्यांना अटक करण्यात आली. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याशी केलेल्या दंडेलशाहीचा महाराष्ट्र काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाही विरोधात औरंगाबाद काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रामराम शेळके यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार .१ ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाचे कार्यकत्यासह औरंगाबाद-जालना महामार्गावर निषेध आंदोलन केले. या आंदोलनात औरंगाबाद तालुका कांग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रामराव शेळके, सेवादलचे तालुकाध्यक्ष कैलास उकर्डे, युवक कांग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव कोरडे, जहिर सेठ करमाडकर, कृष्णा उकिरडे,रंगनाथ उकर्डे, श्रीमंत भोसले, गजानन मते, जनिमिया, रफिक भाई, रामभाऊ भोसले, राजू मते, सोशल मीडिया प्रमुख राहुल मते व तालुक्यातील अनेक कांग्रेस कार्यकर्ते आदी उपस्थित होते.