आलियाचा हा अंदाज करतो स्तब्ध, पाहा ‘राझी’चा ट्रेलर

0

‘राझी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून यात अभिनेत्री आलिया भट्टचा वेगळाच अंदाज बघायला मिळत आहे. एक भारतीय तरुणी एता पाकिस्तानी आर्मी ऑफिसरसोबत लग्न करते. मात्र हे लग्न केवळ पाकिस्तानला मात देण्याची एक ठरवलेला प्लॅन असतो.

जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शनच्या या चित्रपटात आलिया पुन्हा एकदा आपला दमदार अभिनय दाखवण्यास सज्ज झाली आहे.

पाकिस्तानमध्ये राहून भारतासाठी हेरगिरी करणारी आलिया स्तब्ध करणारी आहे. संवेदनशील विषयावर बनलेला ‘राझी’ चित्रपट दिग्दर्शिका मेघना गुलजार यांचा आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचेही ट्रेलरमध्ये सांगण्यात आले आहे.

भारत-पाकिस्तानच्या वादाच्या पार्श्वभूमिवर बनलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर जेवढा उत्सूकता वाढवणारा आहे. तेवढीच आलियाचा दमदार अभिनय बघण्याची उत्सूकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

खाली क्लिक करून पाहा ‘राझी’चा ट्रेलर……

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.