औरंगाबादमध्ये कोरोना झाल्यानंतर महिलेच्या शरीरात पू; भारतातील पहिलीच घटना

भारतातील ही पहिलीच घटना. आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले

0

औरंगाबाद : कोरोना झाल्यावर त्याचा शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम होत असल्याचे आतापर्यंत आढळून आले आहे. पण कोरोना झाल्यानंतर एका महिलेच्या शरीरात पू निर्माण झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. या विचित्र घटनेमुळे वैद्यकीय यंत्रणाही हैराण झाली असून या महिलेवर तातडीने उपचार करण्यात आले. कोरोना झाल्यावर शरीरात पू भरण्याच्या जगात सहा घटना समोर आल्या आहेत. तर भारतातील ही पहिलीच घटना असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे.
औरंगाबाद येथील मध्यवर्ती ठिकाणी राहणाऱ्या या महिलेची आणि तिच्या निवासाची माहिती गोपनीय ठेवली आहे. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याने आणि पाय दुखू लागल्याने तिला 28 नोव्हेंबर रोजी हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना या महिलेच्या शरीरात पू भरल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आल्याने सर्वांना एकच धक्का बसला. तिचा एमआयआर काढण्यात आल्याने त्यात तिच्या शरीरात प्रचंड प्रमाणात पू निर्माण झाल्याचे आढळून आले. कोरोना झाल्यानंतर शरीरात पू भरण्याची ही भारतातील पहिलीच घटना असल्याने या महिलेवर उपचार करणे डॉक्टरांसाठीही मोठे आव्हान होते. त्यामुळे डॉक्टरांनी या महिलेवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करून तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले आणि या आव्हानावर मात करण्यात यशही मिळविले. डॉ. श्रीकांत दहिभाते यांनी या महिलेवर यशस्वी उपचार केले. सध्या या महिलेची प्रकृती ठणठणीत असून आता तिला कोणतेही साईड इफेक्ट जाणवत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
डॉक्टरांच्या पथकाने या महिलेवर तातडीने उपचार करताना तिच्या शरीरातून सुमारे अर्धा लिटर पू काढला. ही महिला पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला 21 डिसेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जर्मनीत शरीरात पू भरण्याच्या सहा केसेस आढळल्या

कोरोनाची लागण झाल्यानंतर शरीरात पू भरण्याच्या जर्मनीत सहा केसेस आढळल्या आहेत. अशा केसेसमध्ये रुग्णाची अँटीजेन टेस्ट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह येतो, पण त्याच्या शरीरात अँटीबॉडीज असतात असे सूत्रांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.