कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे पाळला निषेध दिन

कामगार संघटना सरचिटणीस किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

0

औरंगाबाद : मराठवाडा विकास सेनेच्या कार्यालयासमोर कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे निषेध दिवस पाळण्यात आला. मराठवाडा औद्योगिक व जनरल कामगार संघटना सरचिटणीस किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

सध्या कंपन्या कामगारांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात करत असल्याने त्यांच्यावर अत्याचार होत आहे. हे अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजे आणि कामगारांना 50 लाख रुपयांचा विमा सुरक्षा कवच मिळाले पाहिजे, अशी मागणी यावेळी सरचिटणीस किशोर पाटील यांनी केली. मराठवाडा औद्योगिक व जनरल कामगार संघटनेची तसेच मजुरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी सर्व कामगारांनी सोशल डिस्टन्स पाळून हे आंदोलन केले.  मराठवाडा विकास सेनेचे तसेच कामगार संघटना संयुक्त समितीच्या प्रमुख मागण्या कोरोना-19 चे सेंटर विभागाप्रमाणे तालुका ठिकाणी जिल्हा ठिकाणी, सक्षम पुरेसे डॉक्टर, नर्सेस व स्टॉपवर औषध पूर्तता करावी., खासगी मोठे रुग्णालय प्रशासनाने ताब्यात घेऊन पूर्ण अपडेट व्हेंटिलेटरची व्यवस्था आठ दिवसांत उभी करावी., सर्व कारखान्यांतील कामगारांची 3 जुलैपर्यंत संपूर्ण चाचणी करावी,
कंपनीत काम करताना कामगार कर्मचारी किंवा कंत्राटी कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्यास पन्नास लाख रुपयाचे विमा कवच मिळाले पाहिजे, सर्व उद्योग कामगार वसाहत व औरंगाबाद शहर 4 जुलै येथे 12 जुलै 2020 पर्यंत पूर्णत: लॉकडाऊन करावे., गमावलेला रोजगार पूर्ण पगारासह कामगारांना परत द्यावा, लॉकडाऊन काळासाठी कामगारांना वेतन दिलं पाहिजे., खासगीकरणाचा कायदा रद्द करावा, अशी मागणी सर्व कामगारांच्या वतीने सरचिटणीस किशोर पाटील यांनी केली. या आंदोलनात सहभागी झालेले व्यंकट शिवाजी हिंगमिरे, आदिनाथ वाकळी, लक्ष्मण मिरज आदींची उपस्थिती होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.