भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध
कृषी विधेयकास स्थगिती, महाविकास आघाडी सरकारचा निषेध करून स्थगिती प्रतीची होळी
औरंगाबाद : वाळूज महानगर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकास स्थगिती देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा बुधवारी निषेध करून स्थगिती प्रतीची होळी करण्यात आली.
रतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकास स्थगिती देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा बुधवारी निषेध करून स्थगिती प्रतीची होळी करण्यात आली.यावेळी अोअॅसिस चौक येथे या प्रसंगी तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा तालुका प्रमुख औरंगाबाद पश्चिम वसंत प्रधान , जिल्हा परिषद सदस्या रेखाताई गजानन नांदूरकर, भाजपा तालुका सरचिटणीस तथा पंचायत समिती सदस्य सतीश पाटील , भाजपा तालुका सरचिटणीस विजय सूर्यवंशी , भाजपा शहरप्रमुख वाळूज महानगर मयूर चोरडिया, ग्रा. प. सदस्य वडगांव को.अमित चोरडिया , संभाजी चौधरी ,ज्ञानेश्वर गोल्हार, सुनील गोरे,तारासिंग तरयावाले, विश्वंभर सगने सह अनेकांची उपस्थिती होती.