नांदेडमध्ये ‘कोरोना’वर प्रतिकारशक्ती मजबूतीसाठी औषध ‘इम्मू’ निर्मिती

केंद्र सरकारच्या 'आयुष' मंत्रालयाची परवानगी, औषधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू

0

नांदेड  : नांदेडमध्ये शेतकऱ्याच्या मुलाने कोरोनावर प्रभावी ठरणारे आयुर्वेदिक औषध तयार केले. राज्यातील मुंबई ठाण्यातून या औषधाला मागणी वाढल्याने सध्या हे शेतकरी कुटुंब प्रकाश झोतात आले. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने परवानगी दिल्याने या औषधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू आहे.

शेतकऱ्याच्या मुलाने कोरोनावर प्रभावी ठरणारे आयुर्वेदिक औषध तयार केले. राज्यातील मुंबई ठाण्यातून या औषधाला मागणी वाढल्याने सध्या हे शेतकरी कुटुंब प्रकाशझोतात आले. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने परवानगी दिल्याने या औषधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू आहे. वेगेवेगळ्या दुर्मिळ वनस्पतीपासून तयार केलेले हे औषध अनेक कोरोना रुग्णांना गुणकारी ठरल्याचा दावा निर्मात्याने केला. शेतकरी संघटनेतील चळवळीतील जुने कार्यकर्ते असलेल्या रंगनाथ कदम यांच्या मुलाने हे औषध बनवले. स्वतः डॉक्टर असलेले कन्हैया कदम हे परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतले आहे, त्याच बळावर त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी ‘इम्मू’ नावाचे औषधाची निर्मिती केली. लिंबगाव येथे त्यांनी विविध वनस्पतींची लागवड केलेली आहे, तर औषध निर्मितीसाठी काही घटक हे बाहेरून मागवले. डॉक्टर कदम यांचे हे औषध प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी म्हणून ओळखल्या जाते. शेतकऱ्याच्या मुलाने मुलाने तयार केलेल्या औषधाला मागणी वाढल्याने शेतकऱ्यांनी अभिमान व्यक्त केला. तर या औषधींचा वापर केलेल्या अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत कदम कुटुंबाचे आभार मानले

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.