औरंगाबाद : औरंगाबाद येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे माजी प्राचार्य वैद्य. राजपाल शंकरराव पाटील यांचे बुधवारी नांदेड येथे वयाच्या ८३ व्या वर्षी कोरोना या आजाराने निधन झाले.
माजी प्राचार्य वैद्य. राजपाल शंकरराव पाटील यांचे बुधवारी नांदेड येथे वयाच्या ८३ व्या वर्षी कोरोना या आजाराने निधन झाले. काही दिवसांपूर्वी वैद्य राजपाल पाटील आणि त्यांचे कुटुंबीयाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता, त्यांचे संपूर्ण कुटुंब नांदेड येथेच कोरोनावर उपचार घेत होते, त्यांच्या कुटुंबाने कोरोना उपचार घेऊन त्यावर मात केली, परंतु दुर्दैवाने वैद्य राजपाल पाटील यांचे यात निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, मुलगा नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.
वैद्य. राजपाल शंकरराव पाटील यांना नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्यांनी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड व उस्मानाबाद येथे अधिष्ठाता म्हणून कर्तव्य बजावले. तसेच सेवानिवृत्तीनंतर त्यांनी औरंगाबाद येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय येथे प्राचार्य म्हणून कार्य केले होते. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव व संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.