पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण
पैठणमध्ये शब्दाची वचनपूर्ती म्हणून भाजपा युमोच्या वतीने वचनपूर्ती परिपत्रक वाटप
पैठण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण झाले असून या एका वर्षात घेतलेल्या विकासात्मक निर्णयांचे माहिती परिपत्रक पैठण शहरात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी निवडणुकीत दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती म्हणून परिपत्रक वाटप करण्यात आले.
भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक सोनेरी अध्याय जोडला गेला, देशामध्ये अनेक दशकांनंतर जनतेने या सरकारला पूर्ण बहुमत देऊन सलग दुसऱ्यांदा सत्तेची जबाबदारी सोपवली, हा इतिहास घडवण्यात जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास टाकला व निवडणूकीत दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती म्हणून ‘सबका साथ सबका विकास, सबका विश्वास’ हा मंत्र घेऊन आज देश सामाजिक, आर्थिक, जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवत आहे. राष्ट्रीय एकता व कलम 370 संबंधित विषय असो, आधुनिक समाजव्यवस्थेत अडसर बनलेला तीन वेळेचा तलाख असो किंवा भारताच्या संवेदनशीलतेचे प्रतीक बनलेले नागरिकत्व कायद्यात सुधारणा, असे अनेक महत्वाकांक्षी प्रश्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोडवले. जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुरज लोळगे, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण पाटील औटे यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी जनतेपर्यंत परिपत्रक वाटप केले, यावेळी विशाल पोहेकर,रुपेश जोशी, राजू शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते..