पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

लसीकरण हे कोरोना विषाणूला हरवण्याचे आपल्याकडे असलेल्या उपायांपैंकी एक, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी नागरिकांना लस घेण्याचे केेले आवाहन

0

नवी दिल्ली : वाढत्या कोरोना संक्रमणा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी नियमानुसार, कोविड लसीचा दुसरा डोस घेतला. खुद्द पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली.
भारतात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत सहभागी होत नरेंद्र मोदींनी १ मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता.

लसीकरण हे कोरोना विषाणूला हरवण्याचे आपल्याकडे असलेल्या काही उपायांपैंकी एक आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस घेतली. ‘आज मी एम्समध्ये कोविड १९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. कोरोनाला हरवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या उपायांपैकी एक उपाय लसीकरणाचा आहे. तुम्ही लस घेण्यायोग्य असाल तर लवकर लस घ्यावी’ असे म्हणत पंतप्रधानांनी को-विन वेबसाईटची लिंकही (CoWin.gov.in) आपल्या ट्विटमध्ये जोडली. पंतप्रधानांना लस देण्याची संधी यावेळी पंजाबशी संबंधित नर्स निशा शर्मा यांना मिळाली. त्यांच्यासोबत सिस्टर पी. निवेदा यादेखील होत्या. या पंतप्रधानांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला तेव्हाही पी. निवेदा या उपस्थित होत्या.

‘आम्ही आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोना लसीचा दुसरा डोस दिला. त्यांच्याशी संवाद साधला. हा एक संस्मरणीय क्षण होता, कारण मला त्यांना भेटण्याचा आणि लस देण्याची संधी मिळाली’ असे निशा शर्मा यांनी मीडियाशी बोलताना म्हटले तर, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला होता. आज पुन्हा एकदा मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली. मी खूप खूश आहे. ते आमच्याशी बोलले आणि आम्ही त्यांच्यासोबत फोटोही काढले’ असे पी निवेदा यांनी म्हटले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.