पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सातव्यांदा सैनिकांसोबत दिवाळी साजरी

नरेंद्र मोदींनी शूर सैनिकांच्या नावानेही एक दिवा लावण्याचे केले आवाहन

0

नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी जैसलमेरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत सीडीएस बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे असणार आहेत. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यापूर्वी पंतप्रधानांनी उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर आदी ठिकाणी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.

या उत्सवांच्या काळातही आपल्या भारत मातेची सेवा आणि सुरक्षा करण्याऱ्या सीमेवर तैनात शूर सैनिकांना लक्षात ठेवून सण साजरे करायचे आहेत. भारत मातेच्या या शूर मुला-मुलींच्या सन्मानार्थ आपल्याला घरात दीप प्रज्वलित करायचे आहेत. मी आपल्या शूर जवानांना सांगू इच्छितो की, तुम्ही सीमेवर असले तरीही संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. आज ज्या कुटुंबातील मुले व मुली सरहद्दीवर आहेत त्यांना मी अभिवादन करतो. प्रत्येक व्यक्ती जो देशाशी संबंधित काही जबाबदाऱ्यांमुळे घरी नाही, ते आपल्या कुटूंबापासून दूर आहेत. मी त्यांचे मनापासून आभार मानतो.

सहा वर्षात कुठे केली दिवाळी साजरी –  2019 : पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे नियंत्रण सीमा रेषेवर  तैनात सैनिकांसोबत दिवाळी साजारी करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी ते म्हणाले होते की, युद्ध किंवा घुसखोरी, या प्रदेशाला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो, परंतु हे स्थान नेहमीच त्या त्रासातून बाहेर पडते. या क्षेत्राने कधीही पराभव पाहिला नाही. 2018: यावर्षी पंतप्रधान उत्तराखंडमध्ये केदारनाथच्या दर्शनासाठी गेले होते. येथे त्यांनी चीन सीमेजवळील हर्सिल गावच्या केंट भागात भारतीय सशस्त्र सेना आणि आयटीबीपी जवानांची भेट घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, बर्फाच्छादित क्षेत्रात कर्तव्याचे आपले समर्पण देशास बळकट करते. आपल्यामुळे, 125 कोटी लोकांची स्वप्ने सुरक्षित आहेत. 2017: यावर्षी मोदींनी जम्मू-काश्मीरच्या गुरेज भागात सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. 2016 : यावर्षी मोदींनी हिमाचल प्रदेशातील चीन सीमेजवळ इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) जवानांसह दिवाळी साजरी केली. 2015: यावर्षी पंतप्रधानांनी अमृतसर (पंजाब) सीमेवर सैनिकांसह दिवाळी साजरी केली. 2014: सियाचीनमधील सैनिकांसोबत मोदींनी दिवाळी साजरी केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.