पंतप्रधान मोदी आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनी वाहिली तरुण गोगोई यांना श्रद्धांजली
84 वर्षीय काँग्रेस नेते तरुण गोगोई यांचे निधन
नवी दिल्ली : आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुवाहाटी वैद्मेयकीय महाविद्यालयाचे अधीक्षक अभिजीत शर्मा म्हणाले की, नऊ डॉक्टरांची टीम वयाच्या गोगाई यांच्यावर उपचार करत होती. 84 वर्षीय काँग्रेस नेते तरुण गोगोई यांचे 23 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात निधन झाले.
आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुवाहाटी वैद्मेयकीय महाविद्यालयाचे अधीक्षक अभिजीत शर्मा म्हणाले की, नऊ डॉक्टरांची टीम वयाच्या गोगाई यांच्यावर उपचार करत होती. 84 वर्षीय काँग्रेस नेते तरुण गोगोई यांचे 23 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात निधन झाले. आसामचे तीन वेळा मुख्यमंत्री असलेले तरुण गोगोई यांना २ नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. 25 ऑगस्ट रोजी गोगोई यांना कोरोनाची लागण झाली होती आणि दुसर्याच दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर 25 ऑक्टोबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या निधनावर ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवल यांनी देखील त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.