महाराष्ट्राचा अभिमान : परभणीच्या सुपुत्र डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांनी दिली कोरोनावर देशाला लस
परभणीचे भूमिपुत्र डॉ. वेणुगोपाल सोमाणी हे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे संचालक
परभणी : परभणीच्या सुपुत्र डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांनी कोरोनावर देशाला लस दिली आहे. आपल्या देशात इंग्लिश मीडियमला नको तेवढे महत्त्व दिले गेले आहे. आपला मुलगा मराठी माध्यमातून शिकला, तर त्याचं पूर्ण शिक्षणचं वाया गेले आहे.असा पालकांमध्ये बदल झालेला दिसतो .जिल्हा परिषदेची शाळा आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या संचालक पदापर्यंत भरारी घेतली आहे.
परभणीचे भुमिपुत्र डॉ. वेणुगोपाल सोमाणी हे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयचे संचालक असून त्यांनी देशातील कोरोनावरील दोन लशींना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.जिल्हा परिषदेचा विद्यार्थी ते डिसीजीआयच्या संचालकपद त्यांचा प्रवास खरंच प्रेरणा देणारा आहे. घरची परिस्थिती जरी साधारण असली तरी डॉ. वेणुगोपाल सुरुवातीपासून आभ्यासात हुशार होते. लहानपणापासूनचं त्यांचा कल औषध निर्मितीकडे होता. म्हणूनच त्यांनी त्याचं पदवीचे शिक्षण फार्मसीमध्ये पूर्ण केले. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत त्यांनी हे यश संपादन केले. मुलाच्या यशाने अभिमानाने मान उंच झाली, असे वेणुगोपाल यांच्या आई-वडिलांनी सांगितले.