सरकारचे विकासाला प्राधान्य, देशाच्या जनेतेचा विश्वास संपादन केला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

0

संसदेत गुरुवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषण केले. आज संसदेच्या दोन्ही सभागृहांना राष्ट्रपतींनी संबोधित केले. सरकारने देशातील जनतेचा विश्वास संपादन केला आहे. तसेच लोकांपर्यंत मूलभूत सुविधा कशा पोहोचतील याकडेही लक्ष दिले, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, ‘हे वर्ष देशासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आपण यावर्षी महात्मा गांधीजींची 150 वी जयंती साजरी करत आहोत. आपला देश महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरच पुढे जात आहे.’ असेही राष्ट्रपती म्हणाले.

त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, आज सर्व देशाचे लक्ष संसदेत होणा-या हालचालींवर वेधले आहे. त्यामुळे आम्ही सर्व मुद्दांवर चर्चा करणार आहोत , असे सांगून त्यांनी विरोधकांना शांततेत अधिवेशन पार पाडण्याचे आवाहन केले.

राष्ट्रपती म्हणाले, ‘माझ्या सरकारने देशाचा विश्वास जिंकला आहे. सर्वांना सुख-शांती मिळेल याकडे लक्ष दिले आहे. सामान्यातील सामान्य कुटुंबाच्या गरजा समजून घेऊन माझ्या सरकारने विकासाला प्राधान्य दिले आहे. सरकारने 9 कोटींपेक्षा जास्त शौचालये बांधली आहेत. शौचालये बांधल्याने गरीबांचे आजारांपासून रक्षण होत आहे. तसेच देशातील प्रत्येक घराघरांत वीज पोहोचविण्यासाठी सरकारने संकल्प केला. त्यामुळे आतापर्यंत 2 कोटी 47 लाख घरांना वीज जोडणी दिली आहे. 20 कोटी जनतेला विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. माझ्या सरकारने 6 कोटी लोकांना गॅस कनेक्शनही दिले आहे. आयुष्य योजनेचाही 50 कोटींहून अधिक लोकांना लाभ मिळाला आहे. माझे सरकार कुपोषण दूर करण्यासाठी काम करत आहे. यासाठी राष्ट्रीय कुपोषण मिशन सुरु केले आहे. तसेच वैद्यकिय महाविद्यालयांसह आरोग्य केंद्र उघडले जात आहे.’

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.