हत्तीवर बसून प्राणायाम, रामदेव बाबा खाली कोसळले, व्हिडीओ व्हायरल

त्यांना दुखापत झाली नाही; परंतु व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

0

मथुरा : योगगुरु रामदेव बाबांना हत्तीवर बसून योग करणे चांगलेच भारी पडले. कारण हत्तीवर योग करताना रामदेव बाबा खाली कोसळले. रामदेव हत्तीवर बसून प्राणायाम करत होते. परंतु हत्तीने हालचाल केल्याने त्यांचा तोल गेला आणि ते हत्तीवरुन खाली पडले. या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, परंतु एका क्षणासाठी तिथे उपस्थित नागरिक घाबरले.

बाबा रामदेव यांनी मथुरेतील महावन रमणरेतीमध्ये असलेल्या कार्ष्णि गुरु शरणानंद महाराजांच्या आश्रमात योग शिबिर आयोजित केले होते. यावेळी रामदेव बाबांनी आश्रमातील संतांना योगा शिकवला. मंचावर असलेल्या गुरु शरणानंद महाराज यांनीही योगासने केली होती. यावेळी रामदेव बाबा हत्तीवर बसून योगा करत होते. पण हत्तीने हालचाल करताच रामदेव बाबांचा तोल गेला आणि ते हत्तीच्या पाठीवरुन घसरले. रमणरेती आश्रमात वाळू असल्याने पडल्यावर त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते त्वरित उभे राहून हसू लागले. मात्र हत्तीवरुन खाली पडल्याने तिथे उपस्थित सर्व संत-महंत आणि भाविकांच्या काळजाचा ठोका चुकला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.