जनतेवर विश्वास नसल्याने जिवंतपणीच स्टेडियमला नाव, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

देशाला काय नेता मिळाला आहे, लोक विसरुन जातील, अशी त्यांना भीती आहे, अशी प्रकाश आंबेडकरांनी केली टीका

0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाऐवजी मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव दिल्यावरुन टीका केली आहे.देशाला काय नेता मिळाला, लोक हे विसरुन जातील, अशी त्यांना भीती आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली असून त्यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.

प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव दिल्यावरुन राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका करताना देशाला काय नेता मिळाला आहे? हे लोक विसरुन जातील याची त्यांना भीती वाटत आहे. यांच्या मृत्यूनंतर लोक लक्षात ठेवतील की विसरतील, याची चिंता आहे. यामुळे त्यांनी मृत्यूपूर्वीच स्टेडियमला नाव दिले, अशी टीका आंबेडकरांनी मोदींवर केली.

मोदीजी लवकरच त्यांच्यासारखे माजी पंतप्रधान होण्याची चिन्हे: भूपेश बघल

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघल यांनीसुद्धा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ही भाजपची परंपरा आहे. अटलजी जिवंत होते, तेव्हा अटल चौक हे त्यांच्या नावावर होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान पदावरून पायउतार झाले आणि छत्तीसगडमध्ये अटल चौक नामकरण करण्यात आले. मोदीजी लवकरच त्यांच्यासारखे माजी पंतप्रधान होण्याची चिन्हे आहेत, अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघल यांनी केली.

जितेंद्र आव्हाड यांना भाजपचे प्रत्युत्तर

अहमदाबादमधील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना थेट हिटलरशी केली आहे. “हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चे नाव दिले होते”, असा टोला आव्हाडांनी मोदींना लगावला आहे. तर, सुधीर मुनगंटीवार यांनी आव्हाड यांना प्रत्युत्तर देताना, यांची स्मरणशक्ती 24 तासांच्या वरती राहत नाही, नाव देण्याचा निर्णय गुजरात क्रिकेट असोसिएशनने केला. नरेंद्र मोदींनी केलेला नाही, असे म्हटले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.